नासिक रोड भागातील जय भवानी रोड परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद.
नाशिक जनमत. नाशिक रोडच्या जय भवानी रोड वर आज सकाळी अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते दरम्यान हा बिबट्या वन विभागाच्या सहा तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर पिंजऱ्यात जेरबंद झालेला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सकाळपासून अनेक नागरिक घरातच बसून होते या भागात बिबट्या असल्याचा चर्चेने वातावरण भयभीत झाले होते दरम्यान नागरिकांच्या सहकार्याने वन विभागाच्या आर्थिक प्रयत्नाने बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती जंगलातील वृक्षतोडी त्यामुळे पुन्हा एकदा बिबट्या सारखे प्राणी शहरी भागाकडे वलत असल्याचे दिसून येत आहे या अगोदर देखील नाशिक मधील पंचवटी गंगापूर रोड अंबड परिसर इत्यादी मानवी वस्ती मध्ये बिबट्या रात्री फिरत असल्याचे दिसून आले आहे नागरिकांनी बिबट्या जेरबंद झाल्याने आनंद व्यक्त केला आहे