कृषीवार्ता

वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी संतप्त.

वाडीवऱ्हे ता. २९ विज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त शेतकरी संघटनेने वाडीवऱ्हे वीज वितरण कार्यालयासमोर आज सकाळी १० वाजेपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जो पर्यंत वीज पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, शेतकरी संघटनेच्या पश्चिम महिला आघाडीच्या सीमा नरवडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ, अर्जुन बोराडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे, वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, माजी सरपंच गणपत जाधव, किसन शिंदे, मुरंबीचे सरपंच बापू मते, उपसरपंच दत्तू मते आदींनी आदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्याना पाठिंबा दिला. आदोलनात वाडीवऱ्हेसह परीसरातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी संघटनेने काल तहसीलदार, पोलीस स्टेशन, वीज वितरण कार्यालय, इगतपुरी, वाडीवऱ्हे यांना आंदोलनाचे निवेदन दिले होते.

शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता विज वितरण कंपनीने शेतीची विज तोडल्याने शेतातील उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे, तसेच जनावरांना देखील पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत,मागील महिन्यात शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विज बिल भरले होते मात्र विज वितरण अधिकारी वारंवार विज खंडित करून पूर्ण विजबिल थकबाक़ी भरण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहे, असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. विज वितरणच्या या धोरणामुळे शेतकरी संतप्त झाले त्यांनी विज कार्यलयावर मोर्चा नेत जो पर्यंत विनाअट विज पुरवठा पूर्ववत होत नाही तो पर्यंत आम्ही कार्यालया समोरून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण तणाव ग्रस्त बनले होते.

नाशिकचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी शासनाच्या धोरणानुसार सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरून सहकार्य करावे अशी भूमिका मांडली. मात्र शेतकऱ्यांनी ती नाकारली. शेतकऱ्याची मागणी योग्य आसल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी शेतकऱ्यांसोबत असल्याची भूमिका घेतली आहे.

शेतकरी आदोलन मागे घेत नसल्याने वाडीवऱ्हे पोलिसांनी बळाचा वापर करुन आदोलकावर कायदेशीर कारवाई सुरु केली आसुन सुमारे शंभर आदोलन करणाऱ्या शेतकऱ्याना ताब्यात घेऊन पोलीस वहानातुन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

एका रणरागिणी शेतकरी महीलेने घरी सागीतले की, जोपर्यत विज पुरवठा पुर्ववत होत नाही तो पर्यत मी घरी येणार नाही. पोलीसांनी ताब्यात घेतले तरी मला जामिन देऊन सोडवु नये. आसे निर्वानीचे सांगितले आहे.

– – – – – – – – – – – – –

रितसर शांततेच्या मार्गाने आमची भूमिका विजवितरण अधिका-यासमोर मांडत होतो, मात्र शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता उलट आम्हलाच पोलिसांनी ताब्यात घेतले ही बाब निषेधार्य आहे.

सीमा नरवडे

महिला आघाडी शेतकरी संघटना

छायाचित्र

विज कार्यलयावर ठिय्या आंदोलन दरम्यान बोलतांना शेतकरी नेत्या सीमा नरवडे, खा. हेमंत गोडसे आणि शेतकरी.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे