अपूर्व दत्तक योजनेअंतर्गत विद्यालयातील गरीब आनाथ अपंग विद्यार्थ्यां करता समाजभिमुख अपूर्व दत्तक योजनेत अनेक विद्यार्थ्यांचा समावेश.
आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित प्राथमिक , माध्यमिक आश्रमशाळा तसेच कृषी तंत्र विद्यालय मानूर ता. कळवण जि. नासिक येथे आज *दिनांक 1* *ऑगस्ट 2022 रोजी* *महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती,नासिक चे समन्वयक मा.आ.डॉ. अपूर्व (भाऊ) हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त* मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या *अपूर्व दत्तक योजने अंतर्गत* विद्यालयातील गरीब, अनाथ अपंग व होतकरू विद्यार्थ्यांकरिता समाजभिमुख अशी अपूर्व दत्तक योजनेअंतर्गत माध्यमिक आश्रमशाळा,मानूर येथील विद्यार्थी कु.केशव भगवान बागुल या अनाथ विद्यार्थ्याची निवड करून पालकत्व स्वीकारले असून या विद्यार्थ्याला पुढील शैक्षणिक काळात शैक्षणिक साहित्य , व त्याला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. याप्रसंगी माध्यमिक आश्रम शाळा,प्राथमिक आश्रम शाळा व कृषी तंत्र विद्यालय मानुर येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.