देश-विदेश
भारतीय लष्कराच्या भरतीसाठी तीन ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करण्याचे आव्हान.
दि.1 ऑगस्ट, 2022
*भारतीय लष्कराच्या भरतीसाठी 3 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन*
*नाशिक, दि.1 ऑगस्ट, 2022 (विमाका वृत्तसेवा):*
मुंबई, मुंबई शहर, ठाणे, रायगड,
पालघर,नाशिक, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यासाठी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस, मुंबई यांच्याकडून 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत लष्कर भरती मेळाव्याचे आयोजन अब्दुल कलाम आझद स्पोर्ट स्टेडियम,कौसा व्हॅली मुंब्रा ठाणे येथे करण्यात आले आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी 3 ऑगस्ट 2022 पूर्वी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत,असे तहसिलदार (सर्वसाधारण) नाशिक डॉ.जयश्री अहिरराव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.