मृत घोषित रुग्ण जिवंत. सिव्हिलचा भोंगळ कारभार
मृत घोषित रुग्ण जिवंत. सिव्हिलचा भोंगळ कारभार
नाशिक | जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णाला मृत घोषित केल्यानंतर तो
काही वेळात उठून बसला. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णाचा मृत झाल्याची पोलिसांत खबर देण्यात आल्याने मृत्यू प्रमाणपत्र तयार केले होते. गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.
याबाबत माहिती अशी, अशोकस्तंभ येथील मोरे नामक व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने गंभीर अवस्थेत रविवारी सिव्हिलच्या जळीत कक्षात दाखल करण्यात आले होते. ९० भाजल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी सकाळी त्याची प्रकृती खालवल्याने तो हलचाल करत नव्हता. रुग्ण मृत झाल्याचे समजून वैद्यकीय अधिकारी आणि वार्डमधील कर्मचाऱ्यांनी या रुग्णाला मृत समजून शवविच्छेदनाकरिता नेण्याची तयारी केली होती. मात्र काही वेळात हा रुग्ण उठून बसल्याने कक्षात सर्वांची धावपळ झाली. तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी पोलिसांत माहिती देत रुग्ण मृत्यू झाल्याची नोंद करून सिव्हिलच्या रजिस्टरमध्ये नोंद केली होती.