जातेगाव जनता विद्यालयात मुलींनी मारली बाजी अरुण हिंगमिरे पत्रकार जातेगांव नांदगाव नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाला मध्ये मुलींनी अव्वल येण्याचा बहुमान मिळवलेला आहे. महाविद्यालयाच्या कलाशाखेत मुलींनी बाजी मारली आहे. कला शाखेतून कु. अश्विनी ज्ञानेश्वर वाघ ८०.६७% टक्के घेत ४८४ गुण मिळवून प्रथम क्र. मिळविला, तर राश्मी शांताराम चव्हाण हिला ७७.५०% टक्के ४६५ गुण मिळवत द्वितिय क्रमांक मिळविला व कु. दिपाली जालिंदर पवार हिला ७७% टक्के घेत ४६२ गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. जनता विद्यालय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्जवल यशाची परंपरा कायम राखली, यावर्षी इयत्ता १२ वी च्या परिक्षेसाठी सर्व ५३ विद्यार्थी होते त्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९२.४५% निकाल लागला आहे.दर वर्षी १२ वीच्या निकालात जनता विद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालय नेहमी आघाडिवर असते. हिच उज्वल यशाची परंपरा यंदा कायम ठेवली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक सरचिटणीस श्री नितिनजी ठाकरे साहेब तसेच मविप्र, नांदगाव ता संचालक श्री अमितजी बोरसे (पाटिल) व माध्यमिक शालेय, समिती गोटु पाटिल तसेच उच्च माध्यमिक शालय समितीचे अध्यक्ष श्री जयवंत पाटिल व विद्यालयाचे प्राचार्य. डी. वाय. चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा श्री पाटिल एस.आर, प्रा.श्री निकम यु. ए, व प्रा. श्रीमती सोनवणे वी.आर. या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांच अभिनंदन केले.

जातेगाव जनता विद्यालयात मुलींनी मारली बाजी
अरुण हिंगमिरे पत्रकार
जातेगांव नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाला मध्ये मुलींनी अव्वल येण्याचा बहुमान मिळवलेला आहे.
महाविद्यालयाच्या कलाशाखेत मुलींनी बाजी मारली आहे. कला शाखेतून कु. अश्विनी ज्ञानेश्वर वाघ ८०.६७% टक्के घेत ४८४ गुण मिळवून प्रथम क्र. मिळविला, तर राश्मी शांताराम चव्हाण हिला ७७.५०% टक्के ४६५ गुण मिळवत द्वितिय क्रमांक मिळविला व कु. दिपाली जालिंदर पवार हिला ७७% टक्के घेत ४६२ गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
जनता विद्यालय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्जवल यशाची परंपरा कायम राखली, यावर्षी इयत्ता १२ वी च्या परिक्षेसाठी सर्व ५३ विद्यार्थी होते त्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९२.४५% निकाल लागला आहे.दर वर्षी १२ वीच्या निकालात जनता विद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालय नेहमी आघाडिवर असते. हिच उज्वल यशाची परंपरा यंदा कायम ठेवली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक सरचिटणीस श्री नितिनजी ठाकरे साहेब तसेच मविप्र, नांदगाव ता संचालक श्री अमितजी बोरसे (पाटिल) व माध्यमिक शालेय, समिती गोटु पाटिल तसेच उच्च माध्यमिक शालय समितीचे अध्यक्ष श्री जयवंत पाटिल व विद्यालयाचे प्राचार्य. डी. वाय. चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा श्री पाटिल एस.आर, प्रा.श्री निकम यु. ए, व प्रा. श्रीमती सोनवणे वी.आर. या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांच अभिनंदन केले.