विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्यास राष्ट्रीय प्रगती साध्य होते – संजय मंडलिक
विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्यास राष्ट्रीय प्रगती साध्य होते – संजय मंडलिक
नाशिक (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी आपली स्पर्धात्मकता वाढवून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या परिश्रमाच्या जोरावर विद्याभ्यासात तसेच क्रीडा क्षेत्रात असे विविध अंगी यश संपादन करावे त्यातून आपल्या प्रगती बरोबरच राष्ट्रीय प्रगती साध्य होते असे प्रतिपादन श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोट ट्रस्ट चे अध्यक्ष संजयशेठ मंडलिक यांनी केले.
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोट नाशिक यांचे वतीने श्री संत नरहरी महाराज यांची 737 वी पुण्यतिथी गुणवंत सत्कार समारंभासह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून नुकतीच साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री संजय मंडलिक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की सुवर्णकार समाजातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच तरुणांना योग्य ते मार्गदर्शन आणि दिशा मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात संस्थेसाठी एक सुसज्य अशी वास्तु अथवा अद्यावत कार्यालय होणे महत्त्वाचे आहे जेथे सुवर्णकार समाजातील विद्यार्थ्यांना, तरुणांना सुवर्ण कलेचे प्रशिक्षण देणे तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे शक्य होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजय मंडलिक, प्रमुख विश्वस्त दिगंबर आंबेकर, उपाध्यक्ष सुरेश ठाणेकर कार्याध्यक्ष प्रा.डॉ.कृष्णा शहाणे, संस्थेचे विश्वस्त राजेंद्र कुलथे, नितीन नागरे, सुनील महालकर, सेक्रेटरी विवेक मालवी, खजिनदार अजय सराफ, सौ तेजल कपिले आदी उपस्थित होते.
सकाळी आठ वाजता श्री संत नरहरी महाराजांच्या मूर्तीची महापुजा, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी तीन वाजता महिला मंडळाचे भजन, सायंकाळी नाशिक महानगरातून ढोल ताशांच्या गजरात श्री संत नरहरी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, संस्थेच्या वेब साईटचे अनावरण, संस्थेच्या ॲपचे उद्घाटन, महाप्रसाद आदी
कार्यक्रमांसह वार्षिक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधव आणि भगिनी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे न्यायाधीश म्हणून निवड झालेल्या रेवती बागडे, फर्मेंटा बायोटेक मुंबई येथील प्रशांत नागरे, डॉ. ऋतुजा कुलथे, नीट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून शासकीय एम.बी.बी.एस. कॉलेजला प्रवेश प्राप्त केल्याबद्दल श्रद्धा मंगेश मईड, राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल पार्थ राजेंद्र शहाणे, श्रुतिका शहाणे, लॉन टेनिस पटू कोमल संजय नागरे, रोईंग पटू श्वेता संजय महाले, ड्रॉइंग स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल लक्ष्मी राहुल काजळे, राज्यस्तरीय बुद्धिबळपटू कैवल्य संदीप नागरे, राष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अपूर्वा शहाणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
दरम्यान सर्व समाज बांधव प्रचंड संख्येने सहपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय शेठ मंडलिक, प्रमुख विश्वस्त दिगंबर शेठ आंबेकर, राजेंद्र शेठ कुलथे, सुनील महालकर, नितीन नागरे, गिरधर आडगावकर, उपाध्यक्ष सुरेश ठाणेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. कृष्णा शहाणे, विवेक मालवी, अजय शेठ सराफ, गणेश बानाईतकर, विजय बुऱ्हाडे, अजित नागरे, कृष्णा कुलथे, श्रीमती सुनिता दौंडकर आदिंसह कार्यकारी मंडळांने प्रयत्न केले.