आरोग्य व शिक्षण
माजी सैनिक व अवलंबितांच्या समस्या* *निराकरणासाठी 14 व 15 फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन* *- ओंकार कापले*
*माजी सैनिक व अवलंबितांच्या समस्या*
*निराकरणासाठी 14 व 15 फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन*
*- ओंकार कापले*
नाशिक, दिनांक: 10 फेब्रुवारी 2023
निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व आजी, माजी सैनिक, विधवा पत्नी तसेच त्यांच्या अवलंबितांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तालुकास्तरावर निफाड येथे 14 फेब्रुवारी व त्र्यंबकेश्वर येथे 15 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तालुका समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी दिली आहे.
याअनुषंगाने, निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तहसील कार्यालयात सर्व आजी, माजी सैनिक, विधवा पत्नी व त्यांच्या अवलंबितांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी केले आहे.