ब्रेकिंग
नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे महामार्ग विषयी बैठक व चाचपाणी.

नाशिक जनमत : महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनकडून प्रस्तावित नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग व्यवहार्य करण्यासाठी नुकतीच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे बैठक झाली.
या बैठकीत नाशिक-पुणे या सेमी हायस्मीड रेल्वेमार्गावरून शिर्डीसाठी २४ वंदेभारत व दोन इंटरसिटी गाड्या चालवण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत प्रामुख्याने हा रेल्वेमार्ग व्यवहार्य करण्याबाबत चर्चा झाली असून मुंबई व पुणे मार्गावरून शिर्डीला जाण्यासाठी वंदेभारत रेल्वे गाड्या या मार्गावरून चालवल्यास हा रेल्वेमार्ग व्यवहार्य होऊ शकतो, याबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.