ब्रेकिंग

महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील ) पुणेचा नाशिकवर विजय

 

 

 

 

महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील )

 

पुणेचा नाशिकवर विजय

 

 

शिरपूर ,जि. धुळे येथे आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत ,एक दिवसीय सामन्यात पुणेने नाशिकवर ७ गडी राखून विजय मिळवला.

 

धुळे येथील सामन्यात प्रथम फलंदाजी करत नाशिकने ५० षटकांत ८ बाद १३० धावा केल्या. कर्णधार शाल्मली क्षत्रियने ३४ व वैभवी बालसुब्रमणीयमने नाबाद २१ धावा केल्या. पुण्याच्या शिवंशी कपूरने ३ व ज्ञानेश्वरी पाटीलने २ बळी घेतले. विजयासाठीचे १३१ धावांचे लक्ष्य पुणेने ३७.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. अमानी नंदलने ५६ व समिका कौशलने नाबाद २२ धावा केल्या. नाशिकतर्फे वैभवी बालसुब्रमणीयमने २ तर अस्मिता खैरनारने १ बळी घेतला.

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे