जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये प्रवेश निश्चितीसाठी शाळेनी ऑनलाईन नोंदणी करावी. अविनाश टीळे
*दिनांक: 13 ऑक्टोबर, 2022*
नाशिक जनमत. *जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रवेश निश्चितीसाठी शाळांनी ऑनलाईन नोंदणी करावी*
*- अविनाश टिळे*
*नाशिक, दिनांक: 13 ऑक्टोबर, 2022(जिमाका वृत्तसेवा):*
जिल्हास्तरावर 2022-23 वर्षामध्ये 93 विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळांनी या क्रीडा स्पर्धांमध्ये प्रवेश निश्चितीसाठी 25 ऑक्टोबर, 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले आहे.
क्रीडा विभागामार्फत 11 ऑक्टोबर 2022 रोजी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षण विभागाचे माध्यमिक व प्राथमिकचे विस्तार अधिकारी व सहाय्यक शिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिका व तालुका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका तसेच क्रीडा शिक्षक उपस्थितीत होते. आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेत 2022-23 या वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा, क्रीडा विषयक योजना, उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच राज्यस्तरावर 17 वर्षाच्या आतील मुले व मुलींसाठी शालेय क्रिकेट स्पर्धा आयोजनाची जबाबदारी जिल्ह्याकडे सोपविण्यात आली असून तालुकास्तरावर 10 खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खेळाडूंकरिता जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी https://nashiksports.com/school/ या संकेतस्थळावर प्राथमिक प्रवेश नोंदणी करून सहभाग घ्यावा, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री टिळे यांनी कळविले आहे.
0000000000