हात माग व वस्त्र उद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी अर्ज करण्यास 11 जुलैपर्यंत मुदत वाढ.
दिनांक: 29 जून, 2022
*हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी*
*अर्ज करण्यास 11 जुलै पर्यंत मुदतवाढ*
*:शीतल तेली*
*नाशिक:दिनांक, 29 जून, 2022 (जिमाका वृत्तसेवा):* केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. इच्छुकांनी 11 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आय आय एच टी बरगढ येथे 13 + 1 तसेच वेंकटगिरी येथे 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत यापूर्वी 10 जून 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु केंद्र शासनाया सुधारीत कार्यक्रमानुसार मुदतवाढ देण्यात आली असून ,आता इच्छुक उमेदवारांना आपले परिपूर्ण अर्ज 11 जुलै २०२२ पर्यंत करता येतील.
उमेदवारांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.