नववर्षाच्या स्वागताला नाशिककर सज्ज. पोलिसांचा कडक बंदोबस्त. 30 ठिकाणी नाकाबंदी. तीन हजार पोलिसांची करडी नजर.
नाशिक जनमत नवीन वर्ष स्वागताच्या सेलिब्रेशन साठी पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी मिळाली आहे हॉटेल्स बार उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने तीन हजार पोलिसांच्या बंदोबस्तात तीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकावर पोलिसांद्वारे कडक कारवाई करण्याच्या इशारा देण्यात आलेला आहे
31 डिसेंबरच्या रात्री व नववर्षाच्या स्वागताला कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी यासाठी मध्याच्या नशा धिंगाणा घालणाऱ्या व भलगाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांना दणका देण्यासाठी शहरात 13 पोलीस ठाणे तर्फे क** बंदोबस्त करण्यात आलेला आहे 30 ठिकाणी नाकेबंदी होणार आहे. बेर्थ ऑनलायझर द्वारे वाहनचालकाची तपासणी करण्यात येणार आहे. नियम तोडणाऱ्या वांधारकावर क** कारवाई करण्यात येणार आहे. 400 हून अधिक मोठ्या हॉटेल्स धाबे आणि तीनशेहून अधिक रिसोड मध्ये पार्ट्या होणार आहेत. मद्यपी सह. गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे . गोंधळ घालणारे यांची वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाण्यामध्ये रवानगी होणार आहे.
चार पोलीस आयुक्त चार पोलीस उपायुक्त सहा आयुक्त 30 निरीक्षक 60 उपनिरीक्षक. 140 गुन्हे शाखेचे अधिकारी. कर्मचारी 230. वाहतूक विभागाच्या चारी शाखेचे कर्मचारी. 200 कर्मचारी दंगल नियंत्रण पथक. शीघ्र कृती दलाचे जवान असा 2200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.
शहारात येणाऱ्या रस्त्यासह पाथर्डी फाटा गरवारे चिंचाळे अंबड टि पॉईंट एबीपी सर्कल पपया नर्सरी पिंपळगाव बावला आनंद वल्ली बारदान फाटा गंगापूर मखमलाबाद म्हसरूळ लिंक रोड आसाराम बापू पूल तवली फाटा पेठ फाटा राहू हॉटेल म्हसरूळ दिंडोरी रोड नवा मेल आडगाव संभाजीनगर लाखलगाव तपोवन कॉर्नर जेलरोड जुना सायखेडा रोड सामनगाव रोड शिंदे पंपिंग. भगूर नाका रवी देवळाली कॅम्प वडनेर गेट महामार्ग परिसर परिसरातील चौफुलीवर नाकाबंदी राहणार आहे
पोलीस आयुक्तांनी आव्हान केले आहे. रस्त्यावर उलटबाजी धिंगाणा घातल्यास आणि जल्लोष करताना भांडणाऱ्यांना पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले आहे शहरात कुठेही काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा 112 क्रमांकावर फोन करण्यास नागरिकांना सांगण्यात आले आहे
संग्रहित फोटो.
विना परवानगी पार्टी करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क शशिकांत गर्जे यांनी दिलेला आहे.