गर्भवती महिलेला तीन किलोमीटर पायपीट करून आणले मुख्य रस्त्यावर. त्रंबकेश्वर तालुक्यातील घटना.

नाशिक जनमत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक पाड्यावर आजही एसटी बस तसेच चार चाकी वाहने जात नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करून मुख्य रस्त्यावर येऊन मग त्रंबकेश्वर व इतर ठिकाणी जावे लागत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. अशीच एक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा येथे घडली. एका गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागल्याने महिलेला डोली करून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर आणावे लागले व त्यानंतर काही अंतरावर असलेल्या अबोली येथील शासकीय रुग्णालयात या महिलेला ऍडमिट करण्यात आले दरम्यान या ठिकाणी एका सुंदर कन्यारत्न ला जन्म दिला. देश स्वातंत्र्य होऊ 75 वर्ष झाली असली तरी देखील अजूनही अनेक खेड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे आणि खेड्यांमध्ये डांबरीकरणाचे रस्ते नाहीत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक पाड्यांमध्ये रात्री अपरात्री कोणी आजारी पडले तर सरकारी दवाखाने नाहीत तसेच अनेक ठिकाणी तर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी हे नेमणुकीच्या ठिकाणी राहतच नाही. दरम्यान सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सर्व सामान्य जनतेच्या गरजेच्या सोयीच्या वस्तू नागरिकांना उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातला आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे. मागील काही वर्षांपूर्वी एका सतरा वर्षीयुतीचा सरपंच आणि मृत्यू झाला होता अशा अनेक घटना उपचाराविना या भागात घडत आहेत.