बॉईज टाऊन शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन.

*बॉईज टाऊन शाळेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन*
‘देश हा देव असे माझा, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा’
दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी बॉईज टाऊन शाळेत 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सशस्त्र दलातील शौर्य पुरस्कार विजेते लेफ्टनंट कर्नल जी. सिवा किरण कुमार, सेना मेडल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ, पर्यवेक्षक पी. डी. मुसळे, नीता ठक्कर, पद्मश्री संवत्सरे, शिक्षक व इ. 9 वी, 10 वी चे विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका ज्योती त्रिवेदी यांनी लेफ्टनंट कर्नल जी. सिवा किरण कुमार, सेना मेडल यांचा परिचय करून दिला तसेच माननीय मुख्याध्यापिका यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या सत्रात सैन्यदल, नौदल, हवाईदल यांचे महत्त्व सांगितले तसेच या क्षेत्रात करियर करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी एकता, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे महत्त्व सांगून मातृभूमी, आई-वडील, शिक्षक यांचा आदर करणे तसेच जीवनातील शिस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्या महान भारत देशाला लाभलेल्या उज्ज्वल इतिहासाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेच्या शिक्षिका सोनिया तिवारी यांचे
- मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती त्रिवेदी यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले⇒.