अहमदनगर आष्टी 66 किलोमीटर मार्गावर धावली पहिली प्रवासी रेल्वे.
नासिक जनमत न्युज. बऱ्याच वर्षापासून चर्चेचा विषय असलेली अहमदनगर आष्टी या ६६ किलोमीटर अंतरावर काल अखेर प्रवासी रेल्वे गाडीला हिरवा झेंडा मिळाला अहमदनगर बीड परळी या 66 किलोमीटर रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी आष्टी डेमो रेल्वे सेवा शुक्रवारपासून सुरू झाली आहे .नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचा उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत पार पडला .या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे पंकजा मुंडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे खासदार सुजय विखे आदी उपस्थित होते. नगर येथून सकाळी सात वाजून 35 मिनिटांनी ही रेल्वे आष्टी कडे निघणार आहे सकाळी 10:30 वाजता आष्टीत पोहचणार आहे त्यानंतर सकाळी 11:30 वाजता अशी इथून निघून ही रेल्वे नगर कडे निघणार आहे दुपारी एक वाजून 55 मिनिटांनी ती नगरला पोहोचणार आहे या प्रवासात महामार्गावरील कडा नवीन धानोरा सोलापूर वाडी नवीन लोणी आणि नारायण डोह ला गाडी थांबणार आहे