नाशिक मार्केटमध्ये कोथिंबिरीला शेकडा 16000. रुपये भाव.
नासिक जनमत न्युज नासिक जिल्ह्यामध्ये अति पावसामुळे कोथिंबीर पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतातच कोथिंबीर सोडून खराब झालेले आहे कोथिंबीर ला मागणी असली तर नाशिक मार्केट मध्ये कोथिंबीर ची आवक खूप कमी आहे त्यामुळे कोथिंबीर चे भाव वाढलेले आहे नाशिक मार्केटमध्ये दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या लिलावामध्ये एका शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला एकोणवीस हजार शंभर रुपये शेकडा भाव मिळाला आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जरी मातोरी मग सरास गिरणारे गोवर्धन दुगाव घोडेगाव सिन्नर निफाड पेठ त्रंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड इत्यादी भागातून पालेभाज्या ची आवक होत असते शुक्रवारी संध्याकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले साईधन कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील जवळ पाडा गावातील अवघे एक क्षेत्र जमीन असलेले शेतकरी युवराज गावित हे कोथंबीर घेऊन आले होते त्यांच्या कोथिंबीर 16 हजार रुपये शेकडा बाजार भाव मिळाला मिळाला सदर कोथिंबीर मनोज परदेशी या व्यापाऱ्यांनी घेतली असून सुरत गुजरात येथील मार्केटला पाठवणार आहे. किरकोळ बाजारात देखील कोथिंबीर चे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.