ब्रेकिंग
मुल्हेरला प्रदर्शनात 28 रानभाज्यांची मांडणी. रानभाज्या खाणे आरोग्यास चांगले प्रदर्शनास मोठा प्रतिसाद.
मुल्हेरला प्रदर्शनात २८. रान भाज्यांची मांडणी
नाशिक जनमत दत्ता जाधव यांनी। मुल्हेर येथील डांग सेवा मंडळ संचालित जनत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पोषण माह अंतर्गत रान भाज्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या सर्वत्र कृत्रिम पद्धतीने भाजीपाल पिकवला जातो. त्यापासून सकस आहार मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना परिसरातील विविध सकस व नैसर्गिक रान भाज्यांची माहिती व्हावी या या उद्देशाने विद्यालयात रान भाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. उद्घाटन प्राचार्य अशोक नंदन यांनी केले यावेळी संस्थेचे संचालक अनिल पंडित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज अहिरे, पर्यवेक्षक अनिल ओतारी हे उपस्थित होते. एकूण ३९ विद्यार्थ्यांन सहभाग घेतला.