नाशिक मधील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची वाहन धारक व नागरिकांची मागणी.
नाशिक जनमत संत धार चालणाऱ्या पावसाने महानगरपालिकेचे व ठेकेदारांचे पितळ उघडे पाडले असून नाशिक शहरातील सर्वच रस्त्यावर खड्डे पडलेले आहे यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे कसरतीचे झाले आहे गॅस लाईन स्मार्ट सिटी या साठी अगोदरच जेसीबीने रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक ठिकाणी खड्डे खोदले आहे त्यामुळे रस्ते चिखलमय झाले आहे त्यामुळे वाहन चालवताना दुचाकी चिखलामध्ये घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच संत झालेल्या पावसामुळे सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहन खराब होण्याचा तसेच कंबर मान पाठ दुखण्याचा त्रास जाणू लागला आहे पाऊस उघडतात रस्ते लवकरात लवकर चांगले करण्याची मागणी वाहनधारक करत आहे. खड्ड्यांमध्ये डांबर व चांगल्या प्रकारचे मटेरियल टाकून खड्डे बुजवणे महत्त्वाचे झाले आहे. मागे अनेक ठिकाणी खड्डे बुजवल्या गेली परंतु ती खड्डे पुन्हा पाऊस पडतात चार दिवसात परत खड्डे पडले. लवकरात लवकर महानगरपालिकेने खड्डे बुजून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी नागरिक व वाहन धारक करताय.