भर दिवसा महिलेवर कोयत्याने वार. महिला गंभीर जखमी.
नासिक जनमत नाशिक शहरातील पाथर्डी परिसरातील एका पेट्रोल पंपावर एका महिला कर्मचारी वर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार काल घडला आहे हल्ला केल्यानंतर संशियत फरार झालेला आहे. सदर व्यक्ती हा घोटी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे त्याचे नाव प्रमोद गोसावी असे आहे त्याचे व पेट्रोल पंपावरील महिला कर्मचारी यांचे प्रेम संबंध दीड वर्षापासून होते दोघांमध्ये भांडणे होत असत हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला
असल्याने तो एक वर्षापासून तो कारागृहात होता दरम्यान ही महिला त्याच्यापासून सुटका होण्यासाठी काही दिवस मुंबई व त्यानंतर नाशिकच्या पाथर्डी भागात राहत होती पेट्रोल पंपावर नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होती सहा वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले होते दरम्यान काल प्रमोद गोसावी यांनी पेट्रोल पंपावर येऊन सदर महिलेवर वाद घालत कोणत्या आणि वार केला दरम्यान या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात नेले आहे काही काळ या परिसरामध्ये तणाव व्यक्त वातावरण होते सदर घटनाही सीसीटीव्ही मध्ये केद्द झाले आहे. सदर व्यक्ती हा महिलेला त्रास देत होता महिला त्याच्यासोबत राहण्यास नाकार देत होती त्याचाच राग म्हणून काल हल्ला करण्यात आला पोलीस अधिक तपास करत आहे