पर्यावरण रक्षण व वाहतूक सुरक्षेचा संदेश युनिटी राइट चे आयोजन.
पर्यावरण रक्षण व वाहतूक सुरक्षेचा संदेश देत ,” युनिटी राईड “ चे आयोजन .
गरुडझेप प्रतिष्ठान चे अंध जागतिक विक्रमवीर सागर बोडके , अंध अजय लालवाणी ,रामेश्वर चव्हान , आदित्य आणि प्रवीण ह्या तरुणांनी मुंबई – केवडिया ( गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचा जगातील सर्वात उंच पुतळा ) हि ६ दिवसीय सायकल मोहीम स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत पूर्ण केली . दिनांक २३ ऑगस्ट २२ रोजी पहाटे ५.३० वाजता सायकल राईड ला दादर येथील शिवाजी पार्क मध्ये असलेल्या समर्थ व्यायाम शाळेपासून प्रारंभ झाला. त्यांचे मनोबल व शुभेच्छा देण्यासाठी व्यायामशाळेचे विद्यार्थी व पांडे सर उपस्थित होते .
ह्या मोहिमेला ,” युनिटी राईड “ संबोधले आहे .तसेच झाडे लावा – झाडे जगवा , सायकल चालवा – प्रदूषण टाळा व विनाकारण हॉर्न वाजवू नका , हेल्मेट वापरा असे सामाजिक संदेश फलक त्यांनी सायकलवर लावले होते व वाटेत जन जागरण केले . गरुडझेप प्रतिष्ठान च्या वतीने डॉ संदीप भानोसे ह्यांनी शुभेच्छा दिल्यात .सादर मोहीम मुंबई – केवडिया – मुंबई अशी ११०० किलोमीटर अंतराची आहे .सर्व तरुण युवांनी ह्याचे नियोजन केले आहे .
ह्यातूनच युवा नेतृत्व विकास संपन्न होतो .ह्या मोहिमची जागतिक विक्रमात नोंद लवकरच नोंद होईल असे प्रतिपादन डॉ भानोसे ह्यांनी केले .