व्यवसायिक सुरक्षा आरोग्य व सेवाशर्ती साहित्याचा मसुदा प्रसिद्ध अधिसूचनेबाबत आक्षेप व सूचना नोंदवाव्यात.
दिनांक: 29 जुलै, 2022
*व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व सेवाशर्ती संहितेचा मसुदा प्रसिद्ध; अधिसूचनेबाबत आक्षेप व सूचना नोंदवाव्यात*
*- कामगार उप आयुक्त वि.ना.माळी*
*नाशिक, दिनांक: 29 जुलै, 2022(जिमाका वृत्तसेवा)*
महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व सेवाशर्ती संहिता (कामगार) नियम 2022 चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रात 18 जुलै 2022 च्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला आहे. या मसुदा अधिसूचनेबाबत आक्षेप व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन नाशिक कामगार उप आयुक्त वि.ना.माळी यांनी केले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्ध पत्रकात नमूद केल्यानुसार, या अधिसुचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्यांबाबत आक्षेप व सूचना असल्यास त्या 45 दिवसांच्या आत कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, ई ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई- 400051 यांच्याकडून किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर सादर कराव्यात, असेही कामगार उप आयुक्त श्री. माळी यांनी कळविले आहे.