*पाथर्डी फाटा ते पिंपळगाव खांब फाटा मार्गावर मान्सूनपूर्व तयारीला वेग रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर*

पाथर्डी फाटा ते पिंपळगाव खांब फाटा मार्गावर मान्सूनपूर्व तयारीला वेग
रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर
नाशिक जनमत : महानगरपालिकेमार्फत अंतर्गत पाथर्डी फाटा – पाथर्डी गाव – पिंपळगाव खांब फाटा या महत्त्वाच्या मार्गावरील नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत विविध कामांना गती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, युटिलिटी कामे शंभर टक्के पूर्ण झाली असून, नाशिककरांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.
सदर रस्ता डांबरी प्रकारातील असून, नवीन नाशिक विभागाअंतर्गत येतो. या रस्त्याची एकूण लांबी ३.८६२ किलोमीटर (३,८६२ मीटर) इतकी आहे. नागरिकांना सुरक्षित, सुकर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून ३१ मे २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कामाची प्रमुख वैशिष्ट्ये
पाथर्डी फाटा ते पिंपळगाव खांब फाटा मार्गावरील नादुरुस्त पॅचेसची दुरुस्ती सुरू युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्त्यावरील वाहतूक पाहता महापालिका प्रशासनाकडून रस्ते मजबुतीकरणावर भर देण्यात येत आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पर्जन्य जल वाहिनीच्या कामांना प्राधान्य क्रमाने करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी दुरुस्ती कामे वेगाने सुरू असून, संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजनदेखील महापालिका प्रशासन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
महानगरपालिकेकडून करण्यात येणारे विशेष प्रयत्न :
मान्सूनपूर्व रस्ते दुरुस्ती मोहीम राबवून ओएफसी, गॅस पाइपलाइन व ड्रेनेज कामांमुळे पुन्हा रस्ता खोदकाम होऊ नये यायासाठी महापालिका प्रशासनाने समन्वय बैठका घेतल्या. शहरातील वाहतुकीवरील परिणाम कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कामांचे नियोजनदेखील करण्यात आले. पावसाळ्यात खड्डे निर्माण होऊ नयेत यासाठी दर्जेदार साहित्याचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी विभागीय पथके सतर्क असून, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या व युटिलिटी नेटवर्क यांचा एकत्रित आढावा घेऊन कामांना गती देण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले आहे.
यूटिलिटी कामांचा आढावा
कामाचे स्वरूप
पूर्ण काम
ओएफसी, महा आयटी सीसीटीव्ही
100 %
एमएनजीएल
100%
पर्जन्य जलवाहिनी
२०० मीटर
सदर मार्गावरील युटिलिटी कामांमध्ये ओएफसी, महा आयटी सीसीटीव्ही अंतर्गत कोणतेही काम शिल्लक नाही. तसेच एमएनजीएल गॅस पाइपलाइन अंतर्गत सर्व काम पूर्ण झाले आहे. तर स्टॉर्म वॉटरलाईन अंतर्गत २०० मीटर काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे.

“महानगरपालिकेकडून संबंधित विभाग व यंत्रणांच्या समन्वयातून कामांना गती देण्यात येत आहे. मान्सूनपूर्व सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना अधिक सुरक्षित व सुविधायुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. “



