दुसऱ्या टप्प्यात सिटीलिंकच्या आणखी ११ ई-बसेस नाशिककर प्रवाशांच्या सेवेत दाखल.*

*विषय – दुसऱ्या टप्प्यात सिटीलिंकच्या आणखी ११ ई-बसेस नाशिककर प्रवाशांच्या सेवेत दाखल.*
नाशिक जनमत केंद्र शासनाच्या PM-eBus Sewa योजनेंतर्गत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) च्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसपैकी गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आणखी ११ ई-बसेस नाशिककर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असून, या बसेस नाशिक शहरातील विविध मार्गांवर धावण्यास सुरुवात झाली आहे.
केंद्र शासनाच्या PM-eBus Sewa योजनेंतर्गत सिटीलिंकच्या ताफ्यात एकूण ५० ई-बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येत आहेत.

सिटीलिंकच्या ई-बस सेवेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर २ ई-बसेसच्या माध्यमातून मार्ग क्रमांक १०२ व १०३ वर सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ११ ई-बसेस नाशिककर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. सदर बसेस मार्ग क्रमांक ३०१, ३०२ व ३०३ वर सुरू करण्यात आल्या असून, या मार्गांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१. मार्ग क्रमांक ३०१ :
• अ) आडगाव ते बारदान फाटा – मार्गे सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगर व पुन्हा त्याच मार्गाने आडगाव.
• ब) तपोवन ते बारदान फाटा – मार्गे सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगर व पुन्हा त्याच मार्गाने तपोवन.
२. मार्ग क्रमांक ३०२ :
• अ) आडगाव ते बारदान फाटा – मार्गे शालिमार, एच.पी.टी. कॉलेज, सातपूर, अशोकनगर व पुन्हा त्याच मार्गाने आडगाव.
• ब) तपोवन ते बारदान फाटा – मार्गे सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगर व पुन्हा त्याच मार्गाने तपोवन.
३. मार्ग क्रमांक ३०३ :
• अ) आडगाव ते सिम्बायोसिस कॉलेज – मार्गे सिव्हिल हॉस्पिटल, पवननगर, उत्तमनगर व पुन्हा त्याच मार्गाने आडगाव.
• ब) तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज – मार्गे सिव्हिल हॉस्पिटल, पवननगर, उत्तमनगर व पुन्हा त्याच मार्गाने तपोवन.
इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक व आधुनिक होण्यास मदत होणार असून, प्रवाशांना आरामदायी व दर्जेदार बससेवा उपलब्ध होणार आहे. नाशिककर प्रवाशांना अधिक चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिटीलिंक प्रशासनाकडून ई-बसेस टप्प्याटप्प्याने विविध मार्गांवर सुरू करण्यात येत आहेत.
तरी, नाशिककर नागरिकांनी सिटीलिंकच्या या पर्यावरणपूरक ई-बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


