ब्रेकिंग

रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत*

*रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत*

*नाशिकजनमत   , दि. 18 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) :*कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होणारी संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेती उत्पादनावरील प्रतिकूल परिणाम लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासह उत्पादकता वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन २०२६-२७ या वर्षात ‘रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट वितरण’ हा घटक राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Agrilogin/Agrilogin या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

रब्बी ज्वारी हे कमी पाण्यात येणारे महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून, जनावरांसाठीही उत्कृष्ट दर्जाचा चारा उपलब्ध करून देणारे पीक आहे. संभाव्य पाणीटंचाईचे दुष्परिणाम कमी करणे, ज्वारीचे क्षेत्र वाढविणे आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता राखणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रब्बी हंगामात ज्वारी पिकाच्या मागील दहा वर्षांतील सुधारित वाणांचा प्रसार करणे आणि उत्पादकता वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर चार किलो प्रति मिनीकिट याप्रमाणे ज्वारी बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Agrilogin/Agrilogin या संकेतस्थळावर लॉगिन करून ‘सीड किट / मिनीकिट’ या पर्यायांतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिकरीत्या अर्ज करता येणार आहे. लाभार्थी निवड करताना प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाचा अवलंब करण्यात येणार आहे.अर्ज करणाऱ्या तसेच योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे शासनाच्या धोरणानुसार वैध शेतकरी ओळख क्रमांक असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी अथवा गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री माने यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे