ब्रेकिंग

भूसंपादनात शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय सहन करणार नाही. आमदार सुरज आहेर

भूसंपादनात शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय सहन करणार नाही

आमदार सरोज अहिरेंचा इशारा

 

प्रतिनिधी | नासिक जनमत

 

 

नाशिकमधून जाणारा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रस्तावित असून, भविष्यात नाशिक हे उद्योगांसाठी सर्वाधिक हॉट डेस्टिनेशन ठरणार आहे. नाशिक शहरानजीक असलेल्या राजुरबहुला शिवारात औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण २४४.३३ हेक्टर म्हणजेच ३६० एकर जमीन संपादन केली जाणार आहे. मात्र ही जमीन संपादित करीत असताना शेतकऱ्यांवरील कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा आमदार सरोज अहिरे यांनी दिला. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असे त्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितले. राजूर बहुला येथील प्रस्तावित एमआयडीसी कल्पासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या बार्गी लावण्यासाठी आमदार आहिरे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासमवेत

 

बैठकीप्रसंगी आमदार सरोज अहिरे, जलज शर्मा व आदित्य मिरखेलकर

 

बैठक घेत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या समस्या भूसंपादन, मोबदला व दर निश्चिती या बाबींकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. राजूर बहुला येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी भूसंपादन करताना प्रशासनाने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची गरज आहे, असे अहिरे म्हणाल्या. यावेळी प्रांताधिकारी अर्पित चौहान, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सर्व बाजू समजून घेऊन त्यांचे हित जपले जाईल असे यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे