ब्रेकिंग

संभाजीनगरचे पुरातन विभागाचे शिष्ट मंडळ शिव मंदिराला भेट देणार. अजूनही काही मंदिरे परिसरात असण्याची शक्यता. 

 

 

 

 

 

 

नाशिकजनमत     परवा रामकुंड परिसरामध्ये रतन काळातील शिवमंदिर सापडले असून या शिव मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी नाशिककर उत्सुक आहे याच पार्श्वभूमीवर पुरातन विभागातर्फे मंदिर केव्हाचे आहे. याचा तपास व शोध घेण्यासाठी शिष्टमंडळ नाशिक मध्ये येणार आहे.

 

सिंहस्थ कामासाठी गोदाघाटावरील काँक्रीट हटवताना आढळलेल्या १७ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिराची केंद्र पुरातत्त्व विभागाने दखल घेतली आहे. गोदाप्रेमी देवांग जानी * यांनी ई-मेलद्वारे माहिती दिल्यानंतर संभाजीनगर सर्कलचे वरिष्ठ अधिकारी अरुण मलिक व त्यांचे पथक गुरुवारी (दि. २६) प्रत्यक्ष पाहणी करून मंदिराचे जुने संदर्भ व काळ तपासणार आहेत. यामुळे मंदिराचा इतिहास उलगडणार असून, वारसा जतनासाठी हा सकारात्मक टप्पा असल्याचे जानी यांनी म्हटले आहे.

 

हे पुरातन मंदिर बघण्यासाठी नाशिककर व नागरिक मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात गर्दी करत आहे

दरम्यान, गोदाकाठावरील इतर पुरातन मंदिरांचाही शोध घेण्याची मागणी भाविकांनी केली आहे. नाशिक शहर धार्मिक क्षेत्र असून पुरातन काळापासून मंदिरांसाठी प्रख्यात आहे प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीत अजूनही काही मंदिरे जमिनीखाली असल्याचे शक्यता निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे