आरोग्य व शिक्षण

महापौरांनी केली घोषणा महानगरपालिका कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तीन हजार वैद्यकीय भत्ता.

 

महापौरांनी केली घोषणा महानगरपालिका कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तीन हजार वैद्यकीय भत्ता

 

त्यामु‌ले महापालिकेच्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

66 वैद्यकीय भत्तावाढीची जुनी मागणी होती. आयुक्तांसंह सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेत वैद्यकीय भत्तावाढीच्या महासभेच्या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला ,

 

नाशिक जनमत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या धावपळीत असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे व आयुक्त मनीषा खत्री यांनी गूडन्यूज दिली आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय भत्त्यात घसघशीत वाढ करत दरमहा एक हजारावरून तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात आला आहे.

 

महापौर, उपमहापौरांसह आयुक्तांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महापालिकेतील बहुतांश कर्मचारी ५० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील असून, कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे अनेकांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. कामाच्या वाढत्या तणावामुळे अनेक कर्मचाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असून, उपचार व औषधांवर मोठा खर्च होत आहे. वाढत्या महागाईमुळे वैद्यकीय खर्चातही मोठी वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना एक

 

हजार रुपये दरमहा वैद्यकीय भत्ता दिला जात होता. परंतु, ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याने त्यात

 

(हिमगौरी आहेर-आडके, महापौर

वैद्यकीय उपचार महागल्याने महापालिका कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय भत्त्यातही वाढ करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर महापौर-आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत या निर्णयावर एकमत झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहें )

वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे