जिल्हा परिषद जाखोरी शाळेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न*.

*जिल्हा परिषद जाखोरी शाळेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न*.
नाशिक जनमत नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या नाशिक जिल्ह्यात स्नेह मेळावे होत आहें. शाळेतील माजी विद्यार्थ्यांना बोलून विद्यार्थ्यांचा सत्कार करून सेन्ह मेळवे शिक्षण विभागातर्फे कार्यक्रम गावोगावी जिल्हा परिषद शाळेत यशस्वीरित्या पार पडत आहे.

याचाच एक भाग म्हणून जाखोरी जिल्हा परिषद शाळे मध्ये मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नातून गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी श्री गणपत जाधव, श्री केशव धात्रक, श्री निलेश जाधव, श्री काशिनाथ जगळे, श्री दशरथ जगळे,श्री सोमनाथ धात्रक, श्री राजू बनकर, श्री बाळू जगळे, श्री कमलाकर शेलार, श्री जयवंत ताजने, श्री कैलास धात्रक, श्री उत्तम घनदाट, श्री अभिजीत घनदाट, श्री नवनाथ आव्हाड, श्री भागवत जगळे, श्री बन्सी थोरात, श्री अशोक शिंदे, श्री किशोर कळमकर, श्री सचिन जगळे,श्री गोविंद पगारे, श्कुमारी मनीषा जगळे शाळा व्यवस्थापन सदस्य

देविदास राजपूत, श्री विश्वास कळमकर उपस्थित होते.शाळेच्या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक श्री दत्तात्रय घुगे सर यांनी माहिती दिली सदर मेळावा उत्साहात पार पडला सूत्रसंचालन श्री जयपाल पोतदार यांनी केले तर श्रीमती वैशाली पवार यांनी आभार मानले



