सागर स्वीट्स मधील मिठाई खाल्ल्याने पाच जणांना झाली विषबाधा. ऐका तरुणाचा मृत्यू. मुंबईतील मुंब्रा चीं घटना.
प्रयोगशाळा अहवाल व पीएम रिपोर्ट नंतर स्पष्ट होणार मृत्यूचे कारण.

संग्रहित छायाचित्र
नाशिक जनमत ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील ‘सागर स्वीट्स’ (Sagar Sweets) दुकानातून विकत घेतलेली अफलातून मिठाई खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा झाली असून, यातील ३५ वर्षीयl तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि मुंब्रा पोलिसांनी कारवाई करत हे दुकान तात्काळ बंद (सील) केले आहे.
घटनेचा सविस्तर तपशी
• नेमकं काय घडलं. मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील सागर स्वीट्समधून खरेदी केलेली ‘अफलातून’ मिठाई खाल्ल्यानंतर पाच जणांची प्रकृती अचानक बिघडली. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
• एकाचा मृत्यू. या घटनेत जुबेर अन्सारी (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिठाई खाल्ल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे, तर इतर चार जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
• प्रशासनाची कारवाई. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंब्रा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या पथकाने दुकानाची तपासणी केली. दुकानातील मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुढील आदेशापर्यंत दुकान बंद ठेवण्यात आले आहे.
• तपासाची सद्यस्थिती. तरुणाचा मृत्यू नेमका मिठाईतील विषबाधेमुळेच झाला आहे की अन्य काही कारणाने, हे प्रयोगशाळेचा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अधिकृतरीत्या स्पष्ट होईल असे सकाळच्या वृत्तात नमूद केले आहे



