प्रभाग क्र6 मध्ये समस्यांचा पाढा म न पा आयुक्तांनी दौरा करावा. संतप्त महिला काढणार आयुक्तांच्या घरावर मोर्चा.

*म न पा आयुक्तांनी प्र.क्र.६ चा दौरा करावा.
संतप्त महिला काढणार आयुक्तांच्या घरावर मोर्चा.
नाशिक जन्मत नाशिक शहरात कुठेही जा समस्याच समस्या आ वासून उभ्या राहिल्या आहेत. रस्ते खणलेले, ड्रेनेज तुटलेले,पाणी नाही,जागोजागी कचऱ्याचे ढीग, नाशिक महानगर पालिकेचे कर्मचारी व अधिकारी कार्यालयात व फिल्डवर भेटत नाही, भेटलेच तर समाधानकारक उपाययोजना होत नाही, विजेच्या समस्या अशा प्रकारे अनेक समस्या या प्रभागात आ वासून उभ्या राहिल्या आहेत. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा संदेश खऱ्या अर्थाने या प्रभागात सार्थ ठरला असुन आता हा प्रभाग सोडुन खेड्यात रहायला जावे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे अशा संतप्त प्रतिक्रिया या प्रभागातील महिलांनी दिल्या आहे. प्रभाग क्रमांक ६ हा शेती व ग्रामीण भागात आहे. मळे परिसर विस्तिर्ण आहे. नाशिक महानगर पालिका अस्तित्वात येऊन इतके वर्ष झाले तरी अद्याप हा प्रभाग प्राथमिक व मुलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे. येथील निवडून येणारे नगरसेवक नाशिक महानगर पालिका कर्मचारी व प्रशासकांना दोष देतात तर नागरिक नगरसेवकांना दोष देतात. शेवटी या प्रकाराचा उद्रेक झाला असुन म न पा आयुक्तांनी या संपुर्ण प्रभागाचा नगरसेवकांबरोबर दौरा करावा. या भागातील समस्या त्वरीत मार्गी लावाव्या अन्यथा या सर्व समस्यांचे फोटो बॅनर काढून म न पा आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या परिसरातील संतप्त महिलांनी सांगितले.
या संतप्त महिलांनी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घातला व तुम्ही आमच्या घरोघरी आला होतात म्हणुन आम्ही तुम्हाला नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीत मते दिली. आता तुम्ही आमचे कामे मार्गी लावा अन्यथा आम्ही म न पा आयुक्ताच्या घरावर मोर्चा काढू व त्यांना आमच्या समस्यांचा पाढा दाखवू. नगरसेवक म्हणतात निधीची तरतुद नाही मग जर आम्हाला प्राथमिक सुविधा मिळत नसतील तर आम्ही विविध कर का भरायचा, ज्या भागात अद्यापही प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत तेथे निधी मिळत नाही तर मग विकास निधी जातो कुठे असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. नाशिक म न पा आयुक्तांनी या भागात नगरसेवकांना बरोबर घेऊन त्वरीत दौरा करावा,ए सी मध्ये बसुन या समस्या सुटणार नाही अन्यथा आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आयुक्तांच्या घरावर मोर्चा आंदोलन करणार असल्याचे या प्रभागातील मयुरी सानप,जयश्री महाले, रजनी आहेर, काजल आव्हाड, स्नेहल झनकर, रंजना वाघ,रोहिणी रायकर, रुपाली सोनार, संगिता महाले,आरती आव्हाड, सुजाता फडोळ, सोनाली मुंडे, अंजना अहिरे, जयश्री पिंगळे, लता शेरताटे, शैलजा देवगिरे आदींनी दिला आहे.



