सातपूर मध्ये कारची दुचाकी ला धडक. तीन जन गंभीर जखमी.
कारची दुचाकीला धडक, मायलेकासह तिघे गंभीर
प्रतिनिधी |
नाशिक जनमत नाशिक शहरातील रस्ते सध्या खड्डेमेड झाले असले तरी वाहन चालक वाहन चालवताना काळजी घेत नाही त्यामुळे अपघाताची संख्या वाढलेली आहे काल सातपूर मध्ये
भरधाव जाणाऱ्या कारने पादचाऱ्याला उडवत पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मायलेक आणि पादचारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संशयित कारचालक फरार झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि नितीन पाटील (रा. ध्रुवनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री ८ वाजता अशोकनगर येथे स्टेट बँक
शाखेसमोरील रोडवर दुचाकीने आईसोबत जाताना पाठीमागून आलेल्या कार (एमएच १५ बीएक्स ५५०८) वरील चालकाने भरधाव वेगात दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
यात नितीन पाटील आणि विमल पाटील यांच्या पायाला, दोन्ही हातांना व डोक्यास गंभीर मार लागला. अपघातानंतर पळून जात असताना चालकाने पुढे पायी जाणारे स्वप्नील पाटील यांना धडक दिल्याने त्यांच्या पायास व कंबरेला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कारचालक फरार झाला.