केवल पार्क भागांमध्ये रस्त्यावर आलेल्या मुलाचा रिक्षाने धडक दिल्याने मृत्यू.
नाशिक जनमत प्रतिनिधी नासिक मधील डि जेपी नगर दोन ते केवल पार्क मार्गे सातपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल एका रिक्षाने एका लहान मुलास धडक दिल्याने त्याचे निधन झाले.
दोन वर्षीय मुलगा अंगणातून रस्त्यावर खेळत गेला यावेळी रिक्षा चालक. अखिलेश यादव 44 केवल पार्क हा जोरात रिक्षा चालवत होता. समोर दोन वर्षाचा बालक आला तरी देखील स्पीड कमी नव्हता. हा रस्ता नेहमी रहदारीचा असतो. सातपूर कडे जाण्यासाठी शॉर्टकट असल्याने या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. दरम्यान पावसामुळे रस्ता खराब झालेला आहे. मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव अदनान फिरोज शेख वय वर्ष दोन असे बालकाचे नाव आहे. रिक्षा चालक दारू पिलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी त्यास चांगला चोप दिला. अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागरिकांनी रिक्षा चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आई-वडिलांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष देण्याचे गरजेचे झाले आहे… मागील आठ दिवसांमध्ये चार बालक पाण्यात पडून व आज अंगणात खेळत असताना रस्त्यावर आल्याने बालकाच्या मृत्यू झालेला आहे. अशा घटना घडू नये यासाठी वाण धारकांनी देखील वाहने हळू चालवणे गरजेचे झाले आहे.