ब्रेकिंग

विधान परिषद निवडणूक. गोकुळ गीते नरेंद्र दराडे ना पाठिंबा देणार. सूत्रांची माहिती.

उद्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार.

नाशिक जनमत  विधान परिषद निवडणुकीमध्ये असलेली चुरस आज संपत असल्याचे आज मुंबईत झालेल्या गिरीश महाजन व ऊर्जामंत्री उदय सामंत गोकुळ गीते गणेश गीते यांच्या झालेल्या मीटिंगमध्ये चर्चाहून तोडगा निघाला असल्याचे सूत्रांची  माहिती मिळत आहे.

विधान परिषद निवडणुकीमध्ये येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे व गोकुळ गीते यांच्यामध्ये अत्यंत सुरक्षिषेची लढत होणार होती. गिरीश महाजन उदय सामंत व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देखील गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मोठे प्रयत्न केले परंतु तरीदेखील गोकुळ गीते हे आपल्या निर्णयावर ठाम होते व ते निवडणुकीमध्ये प्रचाराला देखील जोरात लागले होते. अनेक नगरसेवकांच्या भेटी घेत विरोधी उमेदवार नरेंद्र यांना धक्का देण्याच्या तयारीत होते. दरम्यान गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते हे भाजपा त असल्याने युतीचा धर्म पाळावा व गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी व नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न केले जात होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ गीते यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. निमंत्रण स्वीकारून दोन्ही बंधू मुंबईला गेले होते. मुख्यमंत्री यावेळेस अचानक देवेंद्र फडवणीस दिल्लीला गेले असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गोकुळ गीते यांची चर्चा झाल्याची बातमी सूत्र देत आहे.

दरम्यान भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन उदय सामंत ऊर्जामंत्री यांच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती मिळत आहे.

उद्या गोकुळ गीते व गिरीश महाजन उदय सामंत पत्रकार परिषद घेणारा असून त्यामध्ये सविस्तर पत्रकारांना माहिती  देणार असल्याचे सूत्रांची माहिती मिळत आहे.

दरम्यान उमेदवारांमध्ये गोकुळ गीतेंच्या  समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून. गोकुळ गीतेंना आमदारकीची अशी संधी पुन्हा मिळणार नाही. अशी चर्चा निफाड मतदार संघात रंगले आहे व मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवस विधान परिषद निवडणुकीच्या आमदारकी व निवडणुकीची रंगलेले युद्ध शांत होण्याची शक्यता वाढलेली आहे. दरम्यान ही सर्व माहिती सूत्रांच्या अहवाल्यानुसार नाशिक जनमत न्देत आहे.

दरम्यान गोकुळ गीते यांच्या पाठिंब्या विषयी सविस्तर माहिती पत्रकार परिषद मध्ये उद्या समजू शकेल.  दरम्यान सध्या तरी जोरदार चर्चा रंगली आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे