“उन्नत नाशिक अभियान” अंतर्गत अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी नदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम**

**“उन्नत नाशिक अभियान” अंतर्गत अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी नदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम**
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या “उन्नत नाशिक अभियान” संकल्पनेतून अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज गोदावरी नदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. शहरातील धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रामकुंड परिसरात ही मोहीम पार पडली.

नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन व गोदावरी संवर्धन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत दररोज हजारो भाविक भेट देणाऱ्या गोदाघाट परिसरात स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने तब्बल २२७० स्वयंसेवक, संग्राम सैनिक व भक्तगण सहभागी झाले होते. तसेच ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटच्या कर्मचाऱ्यांचेही विशेष सहकार्य लाभले.
यावेळी अहिल्याबाई होळकर पूल ते टाळकुटेश्वर दरम्यान गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील पानवेली काढून व्यापक स्वच्छता करण्यात आली. तसेच नदीपात्र व परिसरातील प्लास्टिक कचरा, निर्माल्य, जलपर्णी तसेच इतर टाकाऊ वस्तू हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर मोहिमेत नदीपात्रातील २२.३४५ टन (२२,३४५ किलो) पानवेली व कचरा संकलित करून पुढील प्रक्रियेसाठी खतप्रकल्प येथे नेण्यात आला. नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या वनस्पती व कचऱ्याचे निर्मूलन करण्यात आल्याने परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षित करण्यात मदत झाली.

यावेळी महापौर सौ. हिमगौरी आडके, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिन्द्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पालोड, विभागीय अधिकारी राहुल जाधव, पंचवटी प्रभाग समिती सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेविका नीलम पाटील, नगरसेविका चंद्रकला धुमाळ, नगरसेविका सरिता सोनवणे, विभागीय स्वच्छता निरीक्षक किरण मारू, विभागीय स्वच्छता निरीक्षक राजू बोरीसा, दीपक चव्हाण,स्वच्छता निरीक्षक हर्षद मारू, गणेश तांबे तसेच अन्य मनपा अधिकारी उपस्थित होते.
तसेच अखिल भारतीय हिंदू संग्राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मानकर, पीठ प्रमुख संजय गाडेकर, व्यवस्थापक प्रवीण ठाकूर, सतीश शुक्ल (पुरोहित संघ मुख्य विश्वस्त तथा कुंभमेळा समिती अध्यक्ष) व चंद्रशेखर पंचाक्षरी (पुरोहित संघ अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत सदर मोहीम राबविण्यात आली.
यावेळी “नदी ही आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा व पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण भाग असून तिचे संवर्धन व स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असा संदेश देण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेमार्फत शहरात स्वच्छता, नदी संवर्धन व पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी देखील सार्वजनिक ठिकाणे व नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



