ब्रेकिंग

झाडाचा पाला तोडताना विजेचा धक्का तरुणाचा मृत्यू

वडाळा नाका परिसरात घडली घटना

संग्रहित छायाचित्र.

प्रतिनिधी, नाशिक जनमत विद्युत कंपनीच्या दुर्लक्षामुळे वाढलेल्या झाडाच्या फांद्या व त्यातून पाल्यात उतरलेल्या नाशिक विद्युत प्रवाहामुळे वडाळा नाका परिसरात एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

 

पोलीस त्याच्या घराचा पत्ता शोधत असून याबाबत सविस्तर वृत्त असे की

शहरातील वर्दळीच्या वडाळा नाका परिसरात झाडाचा पाला तोडताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसून खाली कोसळलेल्या ४० वर्षीय बेघर व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजू चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचे मूळ गाव तसेच कायमचा पत्ता अद्याप समजू शकलेला नाही.

गुरुवारी (दि. २६) राजू चव्हाण हे वडाळा नाका परिसरात झाडाचा पाला तोडत होते. याचदरम्यान त्यांचा संपर्क जवळून गेलेल्या वीजवाहिनीशी

आला. विजेचा धक्का बसताच ते उंचावरून थेट जमिनीवर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. घटना घडताच त्यांचे सोबती रवी मेटकर यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी चव्हाण यांना सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले; मात्र दुखापती गंभीर असल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय कोरे यांनी तपासून राजू चव्हाण यांना मृत घोषित केले. मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलीस त्याच्या घराचा पत्ता शोधत असून अधिक तपास पोलीस करत आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे