अमृतभारत एक्स्प्रेस गाडीत ‘आरपीएफ’ची कारवाई. रेल्वे प्रवाशाकडे सापडले दीड कोटी रुपये.

रेल्वे प्रवाशाकडून तब्बल दीड कोटीची रोकड जप्त !
अमृतभारत एक्स्प्रेस गाडीत ‘आरपीएफ’ची कारवाई,
नाशिक जनमत काल नासिक रोड रेल्वे स्टेशनवर अमृत भारत एक्सप्रेस मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने व छटपूजा असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये आरपीएफ तर्फे क** तपासणी केली जात आहे. काल नाशिकरोड येथे रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सतर्कता मोहिमेतंर्गत अमृतभारत एक्स्प्रेसमधून जळगाव ते कल्याण रेल्वेगाडीत प्रवास करणाऱ्या तरुणाकडून एक कोटी ४८ लाख ६४ हजाराची रोकड जप्त केली. एवढ्या मोठ्या रोकडबाबत समाधानकारक माहिती व कागदपत्रे न दिल्याने ‘आरपीएफ’ने त्याला रकमेसह आयकर विभागाच्या ताब्यात दिले.
दिवाळी व छटपूजेच्या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ व रेल्वे प्रशासन विशेष तपासणी मोहिम राबवत आहे. अयोध्येवरून मुंबईला जात असलेली अमृतभारत एक्स्प्रेस ही गुरुवारी
सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आली. ‘आरपीएफ’चे प्रधान आरक्षक नरेंद्र पाडवी, आरक्षक रवींद्र राठोड, गौतम बिराडे हे जवान रेल्वेगाडीत तपासणी करत होते. यावेळी जनरलच्या डब्यात गुंदीप
संशयित तरुण ‘कुरियर बॉय’ ?
या घटनेची माहिती ‘आरपीएफ’ ने आयकर विभागाच्या अन्वेषण युनिट क्रमांक एकला दिली. आयकर विभागाचे पथक रेल्वे स्थानकात दाखल झाले. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी भामरे व त्याच्याकडे मिळालेली रोकड आयकरच्या पथकाच्या ताब्यात दिली. भामरे हा कुरियर बॉयसारखे काम करत असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. सदर रक्कम ही कोणी दिली, कोठे पोहचवायची होती, कोणाला द्यायची होती याचा आयकर विभाग शोध घेत आहे.
बाळासाहेब भामरे (२४, रा. गोमवाडी, जि. सांगली, सध्या रा. भवानी पेठ, जळगाव) हा आपल्या बॅगला पकडून संशयास्पदरित्या बसलेला दिसला. त्याने आपण जळगाव येथून बसल्याचे व कल्याणला उतरणार असल्याची

माहिती दिली. आरपीएफचे निरीक्षक नवीन प्रतापसिंह, उपनिरीक्षक लवकुश वर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक दिनेश यादव यांच्या समक्ष भामरेकडे असलेली बॅगची जवानांनी तपासणी केली. बॅगेत पाचशे, दोनशे, शंभराच्या नोटांचे बंडल बांधलेले गड्ढे आढळले दरम्यान हा पैसा काही ज्वेलर्स व्यवसायिकाचा असल्याचे कळते. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.



