अंबड पोलिसांनी डॉन ची काढली मिरवणूक. नागरिकांमध्ये समाधान
सिडको : ‘ नाशिक मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलीस कठोर कारवाई करत असले तरी गुन्हेगारी थांबता थांबत नाहीये दोन दिवसांपूर्वी सिडको त आम्ही या
परिसरातील डॉन आहोत’, ‘कोणी मध्ये पडले तर त्याला संपवून टाकू’, असे म्हणत मद्यधुंद अवस्थेत व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना ‘घडा’ शिकविण्यासाठी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचण्यासाठीच अंबड पोलिसांनी संशयितांची चांगलीच जिरवली. ज्या ठिकाणी दहशत माजवली त्याच ठिकाणी पोलिसांनी संशयितांची ‘धिंड’ काढून गुन्हेगारी प्रवृत्तीला माफी नाहीच, असा जणू संदेश देऊन सर्वसामान्य नागरिकांना आश्वस्त केले.
पोलिसांनी गस्त वाढवावी. नेहमी गुन्हेगारांवर वचक बसावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सोमवार, १० ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी चौकात रात्रीच्या
सुमारास संशयित स्वप्नील सुभाष कावले, गुड्डू ऊर्फ प्रेम एकनाथ सावंत, राहुल विठ्ठल पालटे, सनी राजू आठवले (सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत), सुफियान सलीम शेख (रा. लेखानगर) यांनी व्यावसायिकाला स्टील रॉडने मारहाण केली होती. तसेच रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका
चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान करत दहशत माजवली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अर्घा तासाच्या आत पाचही संशयितांना ताब्यात घेतले होते. या घटनेने
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये गुन्हेगारांबद्दलची भीती कमी व्हावी, या उद्देशाने पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातून यातील संशयितांची धिंड काढली यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या दरवाजा खिडक्यांमधून मी सर्व दृश्य बघत होते.. संशयित आरोपींबरोबर पोलिसांचा फौजफाटा पाहिल्याने नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. नाशिक मधील विविध भागांमध्ये नवीन नवीन डॉन तयार होत आहे. नागरिकांमध्ये परिसरामध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न निर्माण करत असतात. पोलिसांनी गस्त वाढून या डॉन वर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे