ब्रेकिंग

नाशिक मध्ये घरपट्टी पानपट्टी थकबाकीदारांना अभय योजना. शुल्कात सवलत, ३ लाख ६८ हजार लाभार्थ,  

 

 

नाशिक  जनमत दिवाळी सणा नंतर  काल गुरुवारी झालेल्या स्थायीसभे मध्ये नाशिक महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काल झालेल्या स्थायी सभेमध्ये अभय योजनेचा लाभ थकबाकी दार नाशिक करांनी घ्यावा असे नाशिक महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

 

एक डिसेंबर 2026 ते 15 फेब्रुवारी 2027 या कालावधीमध्ये मालमत्ता कराची संपूर्ण थकबाकी एक कमी भरणाऱ्यांना शास्ती वार फी मध्ये 95 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

महापालिकेची शहरातील तब्बल ३ लाख ६८ हजार नागरिकांकडे ८७२ कोटींहून अधिक घरपट्टी अर्थात मालमत्ता कराची रक्कम थकीत आहे. या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासनाने अभय सादर योजनेला केलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीने गुरुवारी (दि. १९) हिरवा कंदील दाखविला. दरम्यान, करवसुली विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने मानधनावर कर्मचारी भरती करण्याचे निर्देश सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले आहेत. यावेळी मानधनावर कर्मचारी भरती करणार असल्याचे सांगण्यात आले.

घरपट्टी पानपट्टी कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रत्येक आठवड्याला अहवाल सादर करण्याचा सूचना अधिकाऱ्यांना सभापतीने दिल्या.

..

 

१६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत थकबाकी भरणाऱ्यांना ८५ टक्के सवलत दिली जाणार

चार वर्षांपूर्वी कर वसुली विभागातील कर्मचारी संख्या १५२ होती. दरमहा सेवानिवृत्तीमुळे ही संख्या आज ६८ वर आली आहे. मनुष्यबळाचा अभाव हेही करवसुली थकीत राहण्यामागील प्रमुख कारण असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. यावर घरपट्टीच्या देयक वाटपासाठी कंत्राटी कर्मचारी नेमल्याच्या धर्तीवर घरपट्टी वसुलीसाठी मानधनावर कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली. चर्चेअंती थकबाकी वसुलीसाठी मानधनावर कर्मचारी नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पुढील सभेत सादर करण्याचे आदेश सभापतीदिले

 

महापालिकेच्या ११ नोव्हेंबर २०२६ लाख ६८ हजार ५०३ थकबाकीदारांकडे अखेरच्या आकडेवारीनुसार, शहरातील ३ तब्बल ८७२ कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. यामध्ये ४६१ कोटी ५३ लाख रुपयांच्या शास्ती व अन्य शुल्कांचा समावेश आहे. त्यामुळे थकबाकीदारांना सवलतीचे प्रोत्साहन देऊन मूळ मालमत्ता कराची रक्कम वसूल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे