चार दिवसापूर्वी साखरपुडा झालेल्या युवकाचा खून.मनमाड येथील आठवडे बाजारातील घटना.

नाशिक जन्मत प्रतिनिधी मनमाड जुन्या भानगडीतून मनमाड शहरात टोळक्याने मनमाड येथील २६ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना रविवारी (दि. १७) मध्यरात्री उघडकीस आली.
तरुणाच्या चेहऱ्यावर व गळ्यावर वार करीत त्याचा निघृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मनमाड शहर आदरले आहे
पोलिसांनी प्रमुख
तिघा संशयितांसह एकूण सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सुदर्शन चव्हाण (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रविवारी मध्यरात्री आठवडे बाजार, इदगाह भागातील पुलावर सुदर्शन चव्हाणवर टोळक्याने जुन्या वादाच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार केले. संशयितांनी त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यावर मोठे घाव केल्याने सुदर्शन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि जागीच ठार झाला. या प्रकाराने परिसरात मध्यरात्री तणावाचे वातावरण तयार झाले होते. मनमाडचे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन तसेच निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी पाहनी केली.
सुदर्शन चा मृत्यूदेह पोस्टमार्टम साठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला सुदर्शन चा साखरपुडा चार दिवसांपूर्वीच पंधरा मे ला झाला होता. तो मुंबईला वाशी येथे नोकरी करत होता त्याचे आई वडील मनमाडच्या इतगाह भागात राहतात. या घटनेने पुन्हा एकदा मनमाड शहर देखील सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान मनमाड पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.


