ब्रेकिंग

यवतमाळ जिल्ह्यातील महिलेचा तीन चिमुकल्यांसह नांदूर शिंगोटे येथे बंधाऱ्यात पडून मृत्यू.

पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्याला जाणार होते कुटुंब नांदूर शिंगोटे गावत शोक.

 

 

 

  • नाशिक जनमत सध्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. त्यामुळे अंगाची लाईलाई होते . त्यामुळे पाण्याकडे आपोआप नागरिकांचे आकर्षण होते. काल दुर्देवी अशी घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की  सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील नागरे वस्ती परिसरातील बंधाऱ्यात बुडून महिला आणि तीन चिमुकल्यांचा करुण मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. यवतमाळ जिल्ह्यातून पुण्याकडे कामासाठी निघालेल्या मजूर कुटुंबावर या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये मनीषा विजय रामजोशी (वय २८), तिचा मुलगा कार्तिक विजय राम जोशी (११), तसेच भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे ८, सर्व रा.
  • वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ)यांचा समावेश आहे.

अतिशय कष्ट करी हे कुटुंब होतं. दिवसभर उन्हा ना मध्ये कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते

डिग्रस येथील हे कुटुंब पुणे येथे नाली खोदकामाच्या कामासाठी निघाले होते. इतर नातेवाइकांची वाट पाहण्यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी नांदूरशिंगोटे परिसरात तात्पुरता मुक्काम केला होता. मुक्कामाच्या ठिकाणाजवळील नागरे बंधाऱ्यावर शनिवारी मनीषा रामजोशी कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या. सोबत कार्तिक, आदित्य आणि अविनाश हेही गेले होते. बराच वेळ उलटूनही चौघे परत न आल्याने विजय रामजोशी आणि राहुल शिंदे यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. तेथे कपडे आणि चपला आढळल्याने संशय बळावला. यानंतर दोघांनीही बंधाऱ्यात उतरून शोध सुरू केला. काही वेळातच चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नांदूर शिंगोटे गावातील सर्व नागरिकांनी मदत करून सिन्नर येथे मृत्यू देह आणले पोस्टमार्टम करून यवतमाळ येथील दिग्रस या गावी या महिला वमुलांचा अंत्यविधी होणार आहे. गावातील सर्व नागरिकांनी एकत्र 41 हजार रुपयाची आर्थिक मदत या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. या घटनेने नांदुर-शिंगोटे तील प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे