आरोग्य व शिक्षण

आमदार फरांदे यांनी केली द्वारका परिसरातील कामाची पाहणी. आंदोलनाचा दिला इशारा.

अधिकाऱ्यांना सुनावले. संत गतीने चालू असलेले काम जोरात करण्याची मागणी.

 

आमदार फरांदेकडून अचानक पाहणी; आंदोलनाचा इशारा

 पुढील वर्षी भरणाऱ्या कुंभमेळामुळे नाशिक शहरात विकासाची कामे होत असली तरी सर्वत्र खोदकाम वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे नागरिकांना मन संताप सहन करावा लागत आहे बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना तसेच नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांना एक ते दोन किलोमीटर फेरा मारून जावे लागते. वाहतुकीचा नाशिक शहरात पूर्ण खेळ खंडोबा झाला असून नागरिकांच उद्रेक प्रशासनाच्या विरोधात चालू आहे. खोदलेल्या रस्त्याचे कामे त्वरित करण्यात यावे. यासाठी प्रशासना जागी करण्याचे काम जनता करत आहे. दरम्यान द्वारका परिसरातील आमदार देवयानी फरांदे  यांनी काल अचानक पाहणी दौरा केला याबाबत सविस्तर वृत्त असे की

मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौक परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघ कामामुळे होणान्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अस्त झाले आहेत, जर ठेकेदाराने गुरुवार (दि. ७) पर्यंत कोडी रोखण्यासाठी उपाययोजना करीत वाहतूक सुरळीत केली नाही, तर बेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार देवयानी

फरदि यांनी सोमवा री दिला.

द्वारका चौक परिसरातील संथ कामांची

नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सोमवारी आमदार फरांदे यांनी द्वारका परिसरातील या कामाची अचानक पाहणी केली. या पाहणीत प्रशासनाचा आणि ठेकेदाराचा मोठा सावळागोंधळ

उघडकीस आला. कामातील ढिसाळपणा आणि नियोजनाच्या अभावावर संताप व्यक्त करीत आमदारांनी अधिकाऱ्यांची भररस्त्यात कानउघडणी केली. बेशिस्त

वा हण धारकांना शिस्त लावण्यासाठी आदेशही दिले.

वाहतूक नियंत्रण करण्यासाठी

ठेकेदाराने बारा वॉर्डन नेमायाचा दावा

केला होता..

 

कागदावर सात वॉर्डन दिसले आणि

जागेवर तर केवळ दोनच जण होते.

बाकीचे वॉर्डन फक्त कागदावर पगार

लाटण्यासाठी आहेत का, असा सवाल

करीत फरदि यांनी ठेकेदाराला झापले. सव्हिंसरोडवर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या रिक्षा, खासगी ट्रॅव्हल्स आणि बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. काठे गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यातच उभ्या केलेल्या दुचाकी पाहून आमदारांनी संताप व्यक्त केला. ठेकेदारांना अधिकाऱ्यांना चांगल्या दर्जाचे व लवकरात लवकर काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे