ब्रेकिंग

क्रिकेट स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयाच्या मुलींचा संघ राज्य पातळीवर.-

रत्नागिरी येथे राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यात होणार सहभागी* 

 

नाशिक जनमत नाशिक :* विभागीय स्तरावर जळगाव येथे पार पडलेल्या १९ वर्षाआतील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये केटीएचएम महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. केटीएचएम महाविद्यालयचा सेमिफाइनलचा सामना जळगाव ग्रामीण संघासोबत झाला. या सामन्यात केटीएचएम संघाने निर्विवाद वर्चस्व राखून विजय मिळवला . तर अंतिम सामना नंदुरबार संघासोबत झाला. या सामन्यात केटीएचएम संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. सदर संघ दि. २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र झाला आहे .

विजयी संघात सिद्धी पिंगळे ( कर्णधार), कार्तिकी गायकवाड , धनश्री काकड , मधुरा दायमा , श्रद्धा इंगोले , जान्हवी जाधव, अन्विशा सपकाळे, निधी वनवारी, श्रावणी काळे, गौरी अहिरे , अनुष्का सोनवणे , ज्ञानेश्वरी घोलप कावेरी सावंत, आर्या गुजराथी , दिपश्री गव्हाणे , भुमी जेऊघाले . या खेळांडूनी सहभाग घेतला होता .

वरील सर्व खेळाडू राज्यस्तरासाठी पात्र ठरले आहेत. या सर्व खेळाडूंचे मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व सर्व पदाधिकारी, संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्या. डॉ कल्पना अहिरे, उपप्राचार्य डॉ. के.एस.शिंदे, उपप्राचार्य डॉ. वसंत बोरस्ते, विभागप्रमुख किरण रेडगावकर, प्रा. प्रकाश थोरात, प्रा. कैलास कळमकर यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रा. हेमंत पाटील, प्रा.अविनाश कदम, प्रा. गणपत आहेर, प्रा. सागर कडलग, प्रा. उद्धव डेर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.

———————————–

*नाशिक : जळगाव येथील विभागीय शालेय स्पर्धेत यशस्वी खेळाडूंचा सत्कार करताना प्राचार्या डॉ कल्पना अहिरे, उपप्राचार्य डॉ. के.एस.शिंदे, उपप्राचार्य डॉ.वसंत बोरस्ते, विभागप्रमुख किरण रेडगावकर, प्रा. प्रकाश थोरात, प्रा कैलास कळमकर.*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे