मनपा मुख्यालयात मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीपूजन* नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागात मंत्रोच्चार व शंखनादाच्या स्वरात विधिवत लक्ष्मी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

*मनपा मुख्यालयात मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीपूजन*
नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागात मंत्रोच्चार व शंखनादाच्या स्वरात विधिवत लक्ष्मी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.
नाशिक जनमत नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात खजिना विभागात वित्त व लेखा विभागाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर हिमगौरी आहेर-आडके, अभिजीत आडके,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,तेजश्री सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री,नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा या सर्व दाम्पत्यांच्या हस्ते संपन्न झाले.

लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागातील तिजोरीचे पूजन, श्री लक्ष्मी माता, श्री सरस्वती माता, कुबेर आदि देवतांचे आराधना विधिवत पूजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमास शिक्षण सभापती प्रा.शरद मोरे, महिला व बालकल्याण सभापती कोमल मेहरोलीया, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट, उपायुक्त संगीता नांदुरकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेटे, नगर सचिव संजय नेरकर सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,आदींसह आडके परिवारातील आरुष आडके, अन्विशा आडके, शिवांश आडके, रोहित आडके, उर्मिला आडके, निलेश आडके, स्वाती आडके, रितेश आडके, प्रज्ञा आडके,मनीषा देवरे, ओंकार पाटील,मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचा मुलगा गुरु व वीर तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.

या प्रसंगी मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट व ज्योती जयस्वाल यांच्या हस्ते पूजनाचे यजमान दांपत्यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पौराहित्य अभिषेक शुक्ल यांनी केले सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्यालेखाधिकारी विजय विधाते, उपमुख्य लेखापरीक्षक किरण धारणकर,अजय कमोद, राऊत हंसराज वर्मा, महाले,तिडके, महेंद्र केंदळे, आशिष अहिरराव, सूर्यभान खोडे,वैभव मोटकरी,जयेश अत्रे आदींसह वित्त व लेखा विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*कुंभमेळा शहराला उंची देणारा ठरणार – महापौर*

महापौर हिमगौरी आहेर – आडके यांनी शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा देत शहर एक आपलं कुटुंब आहे असे सांगून आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकला एक उंची देणारा ठरणारा असून कुंभमेळ्याचे ध्वजारोहणा नंतर साधुसंतांचा मेळा भरणार आहे. तोच आपल्यासाठी दिवाळी दसरा असल्याचे सांगत शहर विकासाच्या दृष्टीने मनपाच्या वतीने पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*शहराचा विकासावर भर -आयुक्त*
मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहराचा विकास साधला जाणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
*मंगलमय दिवाळीच्या सदिच्छा – सभापती* 
शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा देत ही दिवाळी नाशिककरांना मंगलमय व सुखदायी जावो अशा शुभेच्छा स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी व्यक्त केल्या.


