ब्रेकिंग

महाराष्ट्र शासन व आदिवासी विभाग यांच्यातर्फे भगवान बिसरा कला संगम स्पर्धा.

आदिवासी भागातील स्पर्धकांनी जिकली प्रेक्षकांची मने.

नाशिक जनमत  आदिवासी विभाग व महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत भगवान बिसरा कला संगम स्पर्धा काल स्पर्धेची दुसरी फेरी  नाशिक येथील संभाजीनगर रोडवरील इंदू लॉन्स या ठिकाणी पार पडली.

महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातून जवळपास 800 स्पर्धक या स्पर्धेसाठी आले होते अडीच हजार ते 25 हजार. पर्यंत बक्षीस दिले जाणार आहे अंतिम फेरी गडचिरोली येथे होणार असून अडीच लाखापर्यंत बक्षीस दिले जाणार आहे.

नाशिक प्रमाणे अमरावती येथे देखील काल दुसरी फेरी झाली. काल आदिवासी मंत्री अशोक विळके देखील या कार्यक्रमाला हजर झाले होते

आदिवासी भागातील आदिवासी नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धा आयोजित केले आहे. आदिवासी तरुण व महिला व ज्येष्ठ नागरिक स्पर्धेसाठी आपल्या पारंपारिक वेश्यामध्ये आले होते अतिशय चांगल्या अशा या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या. अनेकांच्या टीम तयार झालेल्या होत्या त्या टीम द्वारे अतिशय सुंदर असं नृत्य गायन व आदिवासी भागातील राहणीमानाचे दर्शन या ठिकाणी घडले.

आदिवासी भागातून आलेल्या स्पर्धकांसाठी बच्चे वाजता तसेच जेवणाची व्यवस्था आयोजकांतर्फे खूप चांगली केली होती. आदिवासी भागातील संस्कृतीचे दर्शन या वेळी झाले.

आनंदी व उत्साही वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे