देश-विदेश

पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन ही काळाची गरज.* – सुनील केदार 

*पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन ही काळाची गरज.* – सुनील केदार

 

नासिक जनमत   पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेसचा पराभव झाला.तेथे इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होत आहे.पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात अराजक माजले होते. भ्रष्टाचार,खुण,दरोडे,बलात्कार, तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नंगानाच,दंडेलशाही,सर्वसामान्यांवर अन्याय व अत्याचार यांनी कळस गाठला होता.सरकार नावाची व्यवस्थाच तेथे शिल्लक राहिली नव्हती.तेथील अराजक पहाता पश्चिम बंगाल भारतात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.भारताचे संविधान राजरोस उघडपणे पायदळी तुडवले जात होते.अशा परिस्थितीत तेथे कोणत्याही परिस्थितीत ममता बॅनर्जी यांचे सरकार पायउतार होणे ही देशाची व काळाची गरज होती. सर्वात महत्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ९१ लाख बोगस मतदार एस आय आरच्या माध्यमामधून रद्द झाले आहे. याचा अर्थ या राज्यात किती रोहिंगे, बांगला देशी व इतर घुसखोर रहात असतील याचा अंदाज येईल.ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात देशाच्या ऐक्याला तडा जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सत्तेची धुंदी चढल्यामुळे ममता बॅनर्जी कोणाचीही व कशाचीही पर्वा करत नव्हत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या राज्यात ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांचा नंगानाच थांबला पाहिजे होता. तो या निवडणुकीत थांबला हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने बरे झाले. क्रांती भुमी म्हणुन प्रसिध्द असलेले राज्य म्हणुन पश्चिम बंगालचे नाव आहे. हे नाव पुन्हा नावलौकिक व्हावे म्हणुन यापुढे भाजप काम करील असे याप्रसंगी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे.

 

याप्रसंगी भाजप कार्यालयासमोर ढोल ताशा, फटाके, आतषबाजी,पेढे वाटत करण्यात आले, याप्रसंगी ना.गिरीष महाजन, भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, आ.सीमा हिरे, महापौर हिमगौर आडके-आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगर सरचिटणीस सुनील देसाई आदीसह मंडल अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे