देश-विदेश

महाराष्ट्र दिनानिमित्त महापौरांच्या हस्ते नाशिक महापालिकेच्या वतीने ध्वजारोहण

 

 

 

*महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक महापालिकेच्या वतीने ध्वजारोहण*

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास आयुक्त अमित रंजन,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पूर्व प्रभाग सभापती मंगला नन्नावरे,पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेविका जागृती गांगुर्डे, नगरसेवक राजेंद्र आहेर, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, नितीन पवार, अजित निकत, सुवर्णा दखणे, संगीता नांदुरकर, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड,शहर अभियंता संजय अग्रवाल,अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, रवींद्र धारणकर, मैंद ,मिळकत व्यवस्थापक नितीन राऊत, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,उद्यान अधीक्षक विवेक भदाणे,शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी, सिटी लिंक मुख्य लेखाधिकारी सुरेखा जाधव,कार्यकारी अभियंता सचिन जाधव,जितेंद्र पाटोळे, नितीन पाटील, अनिल गायकवाड,संदेश शिंदे, विभागीय अधिकारी हेमंत झुटे

अग्निशमन दल प्रमुख संजय बैरागी, सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, उपमुख्यालेखाधिकारी साहेबराव पाटील, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गोपीनाथ हिवाळे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमात वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्य गीताची ध्वनिफीत वाजवण्यात आली.

*विना अपघात सेवेबद्दल वाहन चालक तांबे यांचा गौरव*

नाशिक महापालिका वाहन चालक संघटनेच्या वतीने विना अपघात सेवेबद्दल वाहन चालक संजय तांबे यांना महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपस्थित अधिकारी, पदाधिकारी यांच्या हस्ते गुणवंत कामगार म्हणून गौरविण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे