सिन्नर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटा सिन्नर पोलिसांनी केला गजाआड ०५ गुन्हे उघडकीस

महाराष्ट
सिन्नर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटा सिन्नर पोलिसांनी केला गजाआड ०५ गुन्हे उघडकीस
नासिक जनमत सिन्नर शहर, सिन्नर तालुका परिसरात तसेच नाशिक जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी नाशिक ग्रामीण हद्दीत दररोज नाकाबंदी आयोजित करून संशयित मोटारसायकलीचे कागदपत्रे तपासणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सिन्नर पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या आदेशानुसार सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने दिनांक १९/०४/२०२६ रोजी सायंकाळी सिन्नर शहरातील सरस्वती रोड परिसरात अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करत असताना सरस्वती बायपासकडून एक इसम काळ्या रंगाचे विनाकागदपत्रांचे स्प्लेंडर मोटारसायकलवर येत असताना दिसल्याने गुन्हे शोध पथकाने त्यास थांबवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रामेश्वर शर्मा वय ३२ वर्षे रा. सहवास नगर, कालीका माता मंदिराचे पाठीमागे, मुंबई नाका, नाशिक असे सांगितले. त्याच्याकडे सदर मोटारसायकलचे कागदपत्रे नसल्यामुळे वाहनाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची स्प्लेंडर मोटारसायकल ही अंडरडे खुर्द ता. इगतपुरी जि. नाशिक येथून काही दिवसांपूर्वी चोरी केलेली असल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडून अधिक तपास केला असता सदर इसम हा रेकॉर्डवरील सराईत मोटारसायकल चोर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडून अधिक चौकशी केली असता त्याने घोटी, ओझर, सिन्नर, मुंबई नाका परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ०२ स्प्लेंडर, ०२ पॅशन, ०१ हिरो युनिकॉर्न अशा एकूण २,००,०००/- रु किंमतीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई सिन्नर पोलीस ठाणेकडील ०१, घोटी पोलीस ०१, ओझर पोलीस ०२, मुंबई नाका पोलीस नाशिक शहर ०१ असे एकूण ०५ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. यातील अटक आरोपी करण रामेश्वर शर्मा वय ३२ वर्षे रा. सहवास नगर, कालीका माता मंदिराचे पाठीमागे, मुंबई नाका नाशिक याच्यावर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाणे येथे चोरी, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. श्री वाजसाहेब पाटील सो, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, मा. श्री अदित्य मिरचेटकर सो, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, मा. कांतीलाल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड उपविभाग, निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री हेमंतकुमार भामरे यांच्या गुन्हे शोध पथकातील अमलदार समाधान बोराडे, नितीन डावर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड, यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा/राजू मोरे हे करीत आहेत.
⸻
सिन्नर पोलीस ठाणे येथे दि ३०/०४/२०२६ रोजी मिळून आलेल्या मोटारसायकल
अ.क्र | वाहन क्र | चेसिस क्र | इंजिन क्र | पोलीस ठाणे
1 | MH15HL4009 | MBLHAW114L5M09118 | HA11EVL5M59973 | घोटी पो.स्टे १२७/२०२६ भादंवि ३०३(२)
2 | MH15EQ6272 | MBLHA1013EHH02518 | HA10ELEHH33057 | सिन्नर पो.स्टे १३३/२०२६ भादंवि ३०३(२)
3 | MH15EW3932 | MBLHA10BJFHC78790 | HA10ETFHC06549 | ओझर पो.स्टे ०४/२०२६ भादंवि ३०३(२)
4 | MH15CB2328 | MBLHA10EL8GB02910 | HA10EB8GB05476 | ओझर पो.स्टे १२४/२०२६ भादंवि ३०३(२)
5 | MH15EJ1514 | ME4KC09CKD8597356 | KC09E86606918 | मुंबई नाका पो.स्टे नाशिक शहर १४९/२०२६ भादंवि ३०३(२)


