देश-विदेश

आमदारांची महानगरपालिका आयुक्तांची भेट. खड्डे बुजवा. नाहीतर करणार आंदोलन.

नाशिक जनमत    कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये सर्वच महत्वाच्या रस्त्यांची कामे होत आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरातले रस्ते खोदून ठेवलेले आहे व सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नियोजन चांगले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत आहे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. लहान मोठे अपघात वाहने व नागरिक खड्यात पडून घडत आहे. पावसाळा पंधरा दिवसावर येऊन ठेपलेला आहे ड्युटीवर जाण्यासाठी नागरिकांना एक एक तास अगोदर नि गावे लागत आहे  . आणि ठिकाणी मोठे मोठे मातीचे ढगाळे पडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस जर का पडला तर मातीवरून घसरून नागरिक पडण्याची दाट शक्यता आहे खोदलेल्या खड्ड्यांमध्ये नागरिकांची वाहणे पडणार आहे.. नागरिकांमध्ये संताप आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी स्थानिक आमदार देवयानी फरांदे सीमाताई हिरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत काल दोन्ही आमदारांनी नाशिक महानगरपालिकेत येऊन महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी चर्चा केली आहे. कामात लवकरात लवकर सुधारणा करू नागरिकांना कमी त्रास होईल याची काळजी घेऊ असं आश्वासन आयुक्त मनीषा खत्री यांनी दोन्ही आमदारांना दिला आहे.

विकास कामांत शहरभर खोदकाम झाल्याने नाशिककर संतप्त झाले असून, या नियोजन शून्य कामकाजाला शहर अभियंताच जबाबदार आहेत. त्यांच्यावर तर तत्काळ कारवाई कराच पण येत्या आठ दिवसात काम पूर्ण झालेले रस्ते पूर्ववत करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून तुम्हाला घेऊनच रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू, असा इशारा भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांनी पालिका आयुक्त मनिषा खत्री यांना दिला.

दोन्ही आमदारांनी मंगळवारी  मनपा मुख्यालयात आयुक्त मनिषा खत्री यांची भेट घेतली. ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने रस्ते खोदकाम सुरू असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाय नाहीत. त्यांना काळ्यायादीत टाका एकच रस्ता विविध यंत्रणा वेगवेगळ्या खोदतात. पर्यायी रस्त्यांवरही उपाययोजना नाहीत, असा तक्रारीचा पाढा त्यांनी वाचला. पावसाळा तोंडावर आला असून, खोदलेले रस्ते डागडुजी न केल्यास सर्व शहर वेठीस धरले जाईल, या धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दोन्ही आमदारांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतल्याने बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना घाम सुटला असून ठेकेदारांना वेळे अधिक कामे करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे