गुन्हेगारी

मनी लॉड्रिंगप्रकरणी अशोक खरात वर ईडी तर्फे गुन्हा दाखल.

 

 

नासिक जनमत    संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्या भोंदू अशोक खरात चे नाव गाजत आहे. महिला वरील अत्याचार तसेच मोठ्या प्रमाणात विविध मार्गातून कमवलेले मालमत्ता अशोक खराची डोकेदुखी ठरत आहे. आतापर्यंत 16 गुन्हे दाखल झाले असून 18 मार्चपासून तो पोलीस कोठडीमध्ये आहे. दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्यवाणीच्या दाव्यातून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या संशयित अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. संचालनालयाने सक्तवसुली (ईडी) त्याच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग प्रकरनीं

गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्याची पत्नी व मुलगा देखील फरार आहे. पोलीस शोध घेत आहेत. दररोज अशोक खरात प्रकरनातं नवीन नवीन  स्फोटक माहिती समोर येत असून अशोक खराचे पाय खोलीत चालले आहे

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात याच्याविरुद्धच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये लॉड्रिंगचाही तपास केला जाईल, असे मनी विधान केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने ही कारवाई केली आहे.

 

खरातवर केवळ लैंगिक शोषणाचेच नव्हे, तर आर्थिक गैरव्यवहार, बेकायदेशीर जमीन बळकावणे आणि मालमत्तांचे अवैध व्यवहार केल्याचेही आरोप आहेत. काळ्या पैशाचा वापर करून या मालमत्ता खरेदी केल्या आहेत का, याचा तपास आता ईडी करणार आहे.

 

खरातविरुद्ध यापूर्वीच लैंगिक शोषणाचे आठ गुन्हे दाखल आहेत. फसवणूक आणि खंडणी प्रत्येकी एक गुन्हा नाशिकमध्ये नोंद आहे. शिर्डी

 

पोलिसांत फसवणूक आणि खासगी सावकारी असे दोन गुन्हे नोंद आहेत. १८ मार्चपासून तो पोलिसांच्या कोठडीत आहे.

 

राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. ‘ईडी’ने तपासाची सूत्रे हाती घेतल्याने खरातने केलेले आर्थिक गैरव्यवहार, बेहिशेबी मालमत्ता आणि ‘हवाला रॅकेट’च्या तपासाला वेग येणार आहे. सध्या नागरिकांमध्ये अशोक खरात च्या विविध बातम्या व स्फोटक माहिती जाणून घेण्याकडे कल दिसत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे